व्याजाच्या पैशावरुन व्यापाऱ्यास दोघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट येथे व्याजाच्या पैशांच्या कारणावरुन व्यापाऱ्यास मारहाण करणाऱ्या दोन जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात सनी इंद्रकुमार साहित्या (वय-२६) हा तरुण वास्तव्यास आहे. त्याचे फुले मार्केटमध्ये बाबुजी फुटवेअर नावाने दुकान आहे. सनी साहित्या याने जैनाबाद येथील रुपेश सोनार याच्याकडून ६० हजार रुपये घेतलेले होते. घेतलेले पैसे ठरलेल्या व्याजासह म्हणजेच एकूण १ लाख ९१ हजार ५०० रुपये सनी साहित्या याने रुपेश याच्या बँक खात्यावर जमा करुन परत केली होती. माऋ यानंतरही अजून व्याजाचे पैसे द्यावे या या कारणावरुन ९ मार्च ते १७ मे दरम्यान रुपेश सोनार यांच्यासह चिराग शिरसाठ या दोन जणांनी वेळोवेळी फुले मार्केट येथील दुकानावर येवून सनी साहित्या यास शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा सनी याने दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवारी रुपेश सोनार व चिराग शिरसाठ दोन्ही रा.जैनाबाद या दोघांविरोधात श्हार पोलिसात महाराष्ट्र सावकारी अधिनियमाअंतर्गत तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोनार हे करीत आहेत.

Protected Content