चहाची टपरी फोडून मुद्देमाल लांबविला; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनीतील मंदिराजवळ असलेली चहा विक्रेत्याची टपरीची तोडफोड करून गॅस हंडी, रोकड व सामानांची चोरी केल्याची घटना सोमवारी ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजून ५० मिनीटांनी घडली आहे.  याप्रकरणी बुधवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कमलेश बुधल दास चिमनाणी (वय-३८) रा.बाबा नगर, सिंधी कॉलनी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून त्यांचे सिंधी कॉलनीतील मंदिराजवळ चहाचे टपरी आहे. चहा विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात.  सोमवारी ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजून ५० मिनीटांनी संशयित आरोपी शाहरूख शेख आणि महसीन शहा दोन्ही रा. फुकटपूरा, तांबापूरा यांनी चहाची टपरीची तोडफोड करून टपरीमधील गॅसची हंडी, १ हजाराची रोकड, चहा बनविण्याचे दोन पातेले आणि बिस्कीटे असा एकुण ४ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कमलेश चिमनाणी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शाहरूख शेख आणि महसीन शहा दोन्ही रा. फुकटपूरा, तांबापूरा या दोघांवर बुधवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल सोनार करीत आहे.

 

Protected Content