जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांविषयी जागृती व्हावी. लहान मुलामुलींपर्यंत या लोक कला पोहोचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात ७८० बालकलावंतांनी आपल्या कलांचे २२ सप्टेंबरला सादरीकरण केले.
यात अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली छाप सोडली. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम विजयी झाले त्यांना ११ हजाराचे रोख पारितोषक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. समुह गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला यासाठी सात हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. एकल लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झाले. ३ हजार व चषकाने गौरविण्यात आले.
एकल लोक गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक दोन हजार रोख व चषकाने सन्मानित करण्यात आले. यासह वैयक्तिक नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले त्यांना ५०० रुपये रोख व चषक असे पारितोषिक प्रदान करण्यात आले. समूह लोकगीत व समूह लोकनृत्याच्या सादरीकरणात एकूण २७ शाळांनी सहभाग घेतला होता. पारितोषिक वितरणाप्रसंगी आमदार सुरेभ भोळे, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, मृदंग अॅड्सचे अनंत भोळे, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष-प्रशासन हनुमान सुरवसे, उपाध्यक्ष-उपक्रम अमोल ठाकूर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. विनोद ढगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
अनुभूती स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन यांच्यासह प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले. ज्ञानेश्वर सोनवणे, भूषण खैरनार यांच्यासह अनुभूती स्कूलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत.