दहा लाखांची मागणी करत विवाहितेला मारहाण व जीवेठार मारण्याची धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील काशिनाथ नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी कुसुंबा येथे घर घेण्यासाठी १० लाखांची मागणी करत शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १० मे रोजी दुपारी १ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक अशी की, जळगाव शहरातील काशिनाथ नगरातील माहेर आलेल्या माधुरी अनिल पाटील वय-२३ यांचा विवाह जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील अनिल धनसिंग पाटील यांच्याशी सन-२०१८ मध्ये रीतीरीवाजानुसार झालेला आहे. लग्नाच्या दोन महिन्यानंतर विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी १० लाख रुपये माहेरहवून आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही, या रागातून पती अनिल धनसिंग पाटील यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू, मामसासरे आजल सासू, नणंद यांनी देखील छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी काशिनाथ नगर येथे निघून आल्या. यानंतर शुक्रवारी १० मे रोजी दुपारी १ वाजता त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पती अनिल धनसिंग पाटील, सासू शोभाबाई धनसिंग पाटील, मामसासरे अंबरसिंग उदयसिंग बोरसे, आजलसासू हिराबाई उदयसिंग बोरसे सर्व रा. इंदिरानगर खेडी तसेच ननंद मिनाबाई भैय्यासाहेब पाटील रा. झाडी ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप नन्नवरे हे करीत आहे.

Protected Content