नोकरीचे आमिष विवाहितेला पडले महागात; अडीच लाखाचा ऑनलाईन गंडा

जळगाव प्रतिनिधी । एअरटेल कंपनीत जॉब लावून देण्याचे आमिष दाखवत संभाजी नगरातील २३ वर्षीय विवाहितेची अवघ्या दोन दिवसा सुमारे २ लाख ४२ हजार ६५० रूपयांची फसवणूक केल्याचे ५ जुलै रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी तब्बल महिनाभरानंतर काल मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिलेल्या फिर्यादी नुसार, जयश्री राजेंद्र सोनवणे (वय-२३) रा. विवेक कॉलनी संभाजी नगर, ह्या १ वर्षाच्या मुलीसह राहतात.  २७ जुन २०२१ रोजी त्यांच्या मोबाईवर एअरटेल जॉब संदर्भात मॅसेज आला. यात जॉबसाठी दिलेल्या वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड करण्याचे सांगितले. त्यानुसार विवाहिता जयश्री सोनवणे यांनी शैक्षणिक कागदपत्र अपलोड केले. त्यानंतर २८ जुन रोजी त्यांचे सिलेक्शन झाल्याचे पुन्हा एक मॅसेज आला. समोरील व्यक्ती अमीत अग्रवाल बोलत असल्याचे सांगून तुम्हाला रजिस्ट्रेशन फि भरावी लागेल असे सांगितल्यावर जयश्री सोनवणे यांनी ३ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता फोन पे द्वारे १ हजार ८५० रूपये दिलेल्या क्रमांकावर ऑनलाईन ट्रान्सफर केले. दुसऱ्या दिवशी अमित अग्रवाल यांनी ड्रेस वर मोबाईल , एंप्लायमेंट कार्ड, लॅपटॉप, एसएमएस बुक, प्रिंटर, माऊस अश्या वस्तू पाठवून तुम्हाला याच्यावर काम करायचे आहे असे सांगून त्याचा इंन्सूरन्स काढायचे असल्याचे सांगून ८ हजार ६५० रूपये खात्यावर पैसे टाकावे लागतील असे सांगितले. त्यानुसार सोनवणे यांनी पुन्हा ८ हजार ६५० रूपये पाठविले. त्यानंतर अमित अग्रवालने पुन्हा फोन करून विविध कारणे सांगून वेगवेगळे बँक खाते आणि अकाऊंट नंबरवर वेळोवेळी एकुण २ लाख ४२ हजार ४५० रूपये भरून एअरटेल कंपनीत जॉब मिळाला नाही.  माझे पैसे परत करा असे सांगितल्यावर पैसे परत मिळण्यासाठी पुन्हा परत पैसे द्यावे लागतील असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात अमित अग्रवाल नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९.३० वाजता रामानंद नगरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल रत्ना मराठे करीत आहे. 

Protected Content