कुमारस्वामी सरकार अखेर चार मतांनी कोसळले

HD Kumarswami

बेंगळुरू, वृत्तसंस्था | गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार आज कोसळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर कुमारस्वामी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठरावावर आज (दि.२३)मतदान झाले. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ मते पडली तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार अखेर पडले आहे. अवघ्या चार मतांनी कुमारस्वामींना बहुमत गमवावे लागले आहे.

 

कुमारस्वामी सरकारला आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आले होते. तर दुसरीकडे कर्नाटकात सकाळपासूनच खडाजंगी चर्चा सुरू होती. माझे श्रेत्र सिनेमा निर्मितीचे आहे, मी सिनेनिर्माता आहे. राजकारण हे माझे श्रेत्र नाही, मी अपघातानेच मुख्यमंत्री झालो आहे, असे सांगतानाच सत्ता कायमस्वरुपी राहत नाही. मी फ्लोअर टेस्टला तयार आहे, असे भावूक भाषण कुमारस्वामी यांनी केले.

त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजता कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यानंतर विधानसभेतील उपस्तित आमदारांची मोजदाद करण्यात आली आणि नंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. १६ बंडखोर आमदार विधानसभेत अनुपस्थित राहिल्याने बहुमताचा आकडा १०३ वर आला. मात्र कुमारस्वामींना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. ठरावाच्या बाजूने केवळ ९९ मते पडल्याने अवघ्या चार मताने कुमारस्वामी सरकार कोसळले. तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडली, यावेळी भाजपचे एकही मत फुटले नाही. जेडीएस-काँग्रेसचे १६ बंडखोर आमदार सभागृहात अनुपस्थित राहिले तर बसपाचा उमेदवार तटस्थ राहिल्याने कुमारस्वामींना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही.
कर्नाटकातील पक्षीय बलाबल :-
एकूण सदस्य : २२४
भाजप : १०५
काँग्रेस-जेडीएस: १००
बंडखोर: १६
बसप: ०१

Protected Content