भरदिवसा घरासमोरून रिक्षा लांबविल्याचा प्रकार !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके येथे घरासमोर उभे प्रवासी वाहतूक करणारी भरदिवसा घरासमोरून रिक्षा लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे.

शुक्रवार २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात एका जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, “जळके येथील गोपाळ वाल्मिक सोनवणे वय २९ यांच्याकडे एम.एच.१९ ए.क्यू.७५४४ या क्रमांकाची प्रवासी वाहतुक रिक्षा आहे. लॉकडाऊनपासून धंदा नसल्याने त्यांनी ही रिक्षा घरासमोर उभी केलेली होती. ते दुसर्‍याची रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवतात. शुक्रवारी दुपारी गोपाळ सोनवणे यांची पत्नी घरात काम करत असताना त्यांना अंगणात उभी रिक्षा राहुल भरत जाधव रा.वराड ता.जळगाव हा घेऊन जाताना दिसला. तो परत रिक्षा घेऊन येईल या अपेक्षेने त्यांनी वाट बघितली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!