घरफोडी व मंदिराची दानपेटी लांबविणारा सराईत चोरटा जेरबंद

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात घरफोडी व शनीमंदीराची दानपेटी लांबविणारा संशयित आरोपी युवराज साळुंखे रा. संजय गांधी नगर, चाळीसगाव याला चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे. त्यावर आतापर्यंत वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहे. त्याने मंदीराची दानपेटी आणि घरफोडीची कबुली दिली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील रिंकेश हरीनाम पावरी रा. सिंधी कॉलनी,चाळीसगाव यांचे बंद घरफोडून २० हजाराचा मोबाईल लांबविला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दोन महिन्यापुर्वी जामिनावर सुटून आलेला सराईत चोरटा युवराज साळुंखे रा. संजय गांधी नगर, चाळीसगाव हा शहरात संशयास्पद फिरत असल्याची माहिती  चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोहेकॉ  योगेश बेलदार व पोना  दिपक पाटील यांना मिळाली. त्याच्यावर यापुर्वी वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहे. त्यानुसार रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलीसांनी रेल्वे स्टेशन रेल्वे प्लॅटफार्म येथून अटक केली. त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. शिवाय त्याने शनी मंदीराची देखील दानपेटी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी  पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना दिपक पाटील, पोकॉ निलेश पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, नंदकिशोर महाजन, गणेश कुवर, मोहन सुर्यवंशी, शरद पाटील, प्रविण जाधव यांनी केली. संशयितावर हद्दपारीची कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक  संदीप पाटील यांनी दिली.  पुढील तपास  पोना दिपक पाटील व पोकों अमोल भोसले करीत आहेत.

 

Protected Content