पिंप्राळा रेल्वे गेटजवळ रुळावर धावत्या रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू

 

 

 

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा रेल्वेगेट जवळील रुळावर धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. होती, या महिलेची ओळख पटवण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले,

 

कमलबाई रघुनाथ चौधरी (वय-७६,रा.जोशी पेठ) असे मयत महिलेचे नाव असुन शवविच्छेदनानंतर मृतदेह तीच्या कुटूंबीयांना सोपवण्यात आला.

शहरातील रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या  पिंप्राळा रेल्वे गेटजवळ  रेल्वे खंबा क्रमांक (४१८/१४ – १६) जवळ धावत्या रेल्वेखाली वृद्धेचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे स्टेशन मास्तर विजय सिन्हा यांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानुसार लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सचिन भावसार यांच्यासह  कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वृद्धेचा मृतदेह पंचनामा करून जिल्हा रुग्णालयात हलविला. मयत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिस प्रयत्न करत असतांनाच वृत्तपत्रात छापुन आलेल्या बातमीवरुन या वृद्धेची ओळख पटवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगीतले. 

मयत महिलेचा भाऊ प्रकाश नामदेव माळी (रा.साखळी ता.यावल) हे आज सकाळी वृत्तपत्र वाचत असतांना  बातमीवरुन त्यांना शंका आली. बहीण बेपत्ता असल्याच्या आणि बातमीतील संदर्भ, वर्णन हुबेहुब असल्याने त्यांनी बातमी व्हॉटस्‌ॲपवरुन भाचा मयताचा मुलगा मनोज यास पाठवली. बातमी वाचल्यानंतर कुटूंबीयांनी लोहमार्ग पोलिसात धाव घेतली. सकाळी दहा वाजता तपासाधीकारी सचिन भावसार यांची भेट घेतल्यावर त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांना जिल्‍हा रुग्णालयात आणले, आईचा मृतदेह बघताच मुलगा मनोज याने एकच हंबरडा फोडत आक्रोश केला.

मयत कमलबाई या गुरुवारपासुन बेपत्ता होत्या, दिडवर्षापुर्वी त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने व मानसीक धक्का बसल्याने त्या एककेंद्री वागत होत्या, सोबतच त्यांना फिटस्‌चाही त्रास असल्याने त्या कोणासही न सागंता घरुन निघुन जात असत. मात्र पुन्हा येत होत्या. गुरुवारपासुन त्या घरुन निघाल्या व परतच आल्या नाही. कुटूंबीयांनी शोधाशोध केली. अखेर दुःखद वार्ता कळाली आणि कुटूंबीयांना हादरा बसला.  कमलबाई यांच्या पश्चात मुलगा मनोज, सुन आरती, नातवंडे भाग्येश, ऋुतीका असा परिवार आहे.

Protected Content