विनापरवाना लाकडांची वाहतूक करणाऱ्या चालकांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील तांबोळे येथील शेतातून विनापरवाना वृक्षतोड करून मालेगावकडे लाकडे वाहून नेणारा मिनी ट्रक वनविभागाच्या कर्मचारी यांनी दि ३० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील खडकी बायपासजवळ पकडला असून चाळीसगाव प्रादेशिक वनविभागात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवार दि ३० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वनविभाग प्रादेशिकचे नाकेदार संजय जाधव हे गस्तीवर असताना त्यांना खडकी बायपासवर मिनी ट्रक क्र MH 18 M 5378 हा मालेगावकडे संशयितरित्या जात असल्याने त्यांनी लागलीच ट्रॅक थांबवून चौकशी केली. त्या ट्रकमध्ये बाभूळ व लिंबाची लाकडे भरलेली आढळून आली. अधिक चौकशी केल्यावर सदर लाकडे ही तांबोळे येथील शेतकरी यांच्या शेतातील असून ती विना परवाना तोडून वाहतूक करून ४ घनमीटर लाकुड मालेगाव येथे नेत असल्याची माहिती ट्रक चालक मोहम्मद इब्राहिम मोहम्मद मुनीर रा मालेगाव याने दिल्यावर ट्रक वनविभागाच्या कार्यालयात लावून चालकवर वन गुन्हा 05/2020 भारतीय वनअधिनियम 1947 चे कलम 41, 2 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाकेदार संजय जाधव करीत आहेत तर व्यापाऱ्याचा शोध वनविभागाकडून सुरू आहे.

Protected Content