जळगाव, प्रतिनिधी | पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा, पृथ्वीचा २३.५ अंशांनी कललेला अक्ष आणि अक्षांश व रेखांशानुसार असलेले जळगावचे स्थान यानुसार जळगावात दरवर्षी २६ मे आणि १८ जुलै रोजी ‘झीरो शॅडो डे’ असतो. उद्या १८ जुलै असल्याने उद्या जळगावकरांना ‘झीरो शॅडो डे’ अर्थात ‘शून्य सावली दिवस’ अनुभवता येणार आहे.
‘शून्य सावली दिवस’ म्हणजे संपूर्ण दिवस सावली न दिसणे, असा अर्थ नसून केवळ काही क्षण कुठल्याही सजीव अथवा निर्जीव, वस्तूची किंवा प्राण्याची, सावली त्याच्या तळाशी अथवा पायाशी पडणे, हे ज्या दिवशी घडते, तो दिवस…चला तर मग या ‘झीरो शॅडो डे’ ची सविस्तर माहिती जाणून घेवूया… खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांच्याकडून…त्यांच्याशी बातचीत करीत आहेत, ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ चे वृत्त संपादक विवेक उपासनी…