इंधन दरवाढ विरोधात महिला काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव राहुल शिरसाळे । केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅस, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंची वाढविलेल्या दराच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकार असलेले भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे देशासह महाराष्ट्रातील जनतेचे खूप हाल होत आहे. सततच्या वाढत्या महागाईसह कोरनासारख्या महासंकटात सर्वसामान्य व्यक्तीला ग्रासले आहे. अशा काळात केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून महागाई नियंत्रणात आणणे अपेक्षित होते. परंतु अश्या परिस्थितीत केंद्र सरकार काही मदत करत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेस जळगाव तर्फे केंद्र सरकार विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रतिभा मोरे, सुनीता अडकमोल, सुषमा देशमुख, पुष्पा झाल्टे, शबाना तडवी, सविता सुरवडे, ॲड. मनिषा पवार, कुसुम पाटील, मनीषा पाचपांडे, मानसी पवार, कल्पना तायडे, संगीता नेवे, कांताबाई बोरा, मानसी पवार, ऐश्वर्या राठोड, भाग्यश्री पाठक, छाया कोरडे, योगिता शुक्ल, प्रीती महाजन, कल्पना पाटील यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

 

Protected Content