विदगाव फाट्याजवळून चोरीच्या दुचाकीसह चोरट्यांना अटक

जळगाव प्रतिनिधी ।  शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत.  आज शुक्रवारी एलसीबीच्या पथकाने दोन चोरट्यांना तालुक्यातील विदगाव फाटा येथून अटक केली असून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. 

धरणगावातील रहिवासी योगराज भगवान चौधरी यांची दुचाकी २६ मार्च रोजी एरंडोल रस्त्यावरील हॉटेल मयूरच्या बाहेरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती़ त्यानंतर याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, ही दुचाकी संजय उर्फ काळू बळीराम कोळी (२३, रा. वढोदा, ता. यावल) व गोवरलाल उर्फ गोलू कृष्णनाथ कोळी (२१, रा़ शिरागड ता़ यावल) हे दोन तरूण घेवून फिरत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली़ त्यांनी लागलीच संशयितांचा शोध घेवून अटक करण्याच्या सूचना केल्या़ त्यानुसार दोघांना शुक्रवारी एलसीबीच्या पथकाने विदगाव फाट्याजवळ सापळा रचून अटक केली़ त्यांच्याजवळून चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली असून दोघांना पुढील कार्यवाहीसाठी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मागर्शनाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील आदींनी केली आहे.

 

Protected Content