


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।आर्थिकनियोजन, गुंतवणूक आणि सुरक्षित भविष्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगावात‘आर्थिक साक्षरता कार्यशाळा २०२६’आयोजित करण्यात आली आहे. Grow Rich Financial Services यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत होणार आहे. Ivory Tusk Hotel, गणेश कॉलनी रोड, रॉसॅलंड शाळेसमोर, जळगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यशाळेत राहुल जयवंत पाटील (CWM), Chartered Wealth Manager हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आर्थिक साक्षरतेचे महत्त्व, योग्य आर्थिक नियोजन, भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता आणि उपलब्ध आर्थिक पर्यायांबाबत सहभागीांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली म्हणजे आर्थिक ज्ञान’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत नागरिकांनी सहभागी होऊन आर्थिक नियोजनाबाबत माहिती जाणून घ्यावी, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या सहभागींसाठी सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिक बाबींबाबत अधिक माहिती मिळवून भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांसाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.



