बोदवड न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन

16b18

 

बोदवड (प्रतिनिधी) दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, बोदवड यांचे न्यायालयाचा आणि न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा जळगाव जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती सुनील प्रभाकर देशमुख यांचे शुभहस्ते आणि जळगाव जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंदा आनंदा सानप यांचे अध्यक्षतेखाली आज संपन्न झाले.

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील प्रभाकरराव देशमुख यांच्या हस्तेे बोदवड न्यायालयाचे विधीवत उद्घाटन झाल्याचे त्यांनी घोषित केले. तसेच न्यायव्यवस्था व कायद्याचा सर्वांनी सन्मान राखण्याचे आवाहन केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. पी. सानप म्हणाले की, दिवाणी व फौजदारी असे एकूण ८१५ प्रकरणे बोदवड न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. यावेळी न्यायाधीश पी.वाय.लाडेकर, जिल्हा न्यायाधीश 1, न्यायाधीश एस जी ठुबे, जलदगती जिल्हा न्यायाधीश, एच. डी. देशींगे, ए एस शेख,आणि दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बोदवड संतोष दादाराव गरड, जळगांवचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डाॅ. लोहित मतानी आदि उपस्थित होते.

 

बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.अर्जुन पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अर्जुन पाटील, उपाध्यक्ष अॅड धनराज प्रजापती, सचिव अॅड योगेश सीखवाल ,अॅड के एस इंगळे, अॅड अमोल परदेशी, अॅड ईश्वर डी पाटील, अॅड विजय मंगळकर, अॅड पिंटू चौधरी, अॅड विनोद धनगर , अॅड चंदू पाटील व सहकार्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content