रस्त्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली कोसळली; नगराध्यक्ष व नागरिकांच्या सहकार्यांने वाहतुकीची कोंडी दूर

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड रस्त्यावर आज महावितरणचे सिमेंट पोल घेऊन जात असलेल्या एका ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि ट्रॅक्टरची ट्रॉली कोसळून संपूर्ण पोल रस्त्यावर आडवे पडले. बोदवड नगरपंचायतचे नगराध्यक्ष आनंदा पाटील यांच्यासह नागरिकांच्या सहकार्यांने दोन तासांपासून झालेली वाहतुकीची कोंडी दूर झाली.

याविषयी अधिक माहिती अशी की, “ दर ट्रॅक्टर महावितरणचे सिमेंट पोल घेऊन जात असतांना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली कोसळली आणि रस्त्याच्या मधोमध संपूर्ण पोल आडवे पडले. सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नाही. याच रस्त्याने नगराध्यक्ष आनंद पाटील जात असताना हे त्यांच्या नजरेस हे पडल्यावर त्यांनी आपली गाडी थांबवली. त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते आणि रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या काही नागरिकांना सोबत घेत जमिनीवर कोसळलेली ट्रॅक्टरची ट्रॉली धक्का मारून उभी केली. यासह सर्वांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले खांब बाजूला केले. त्यामुळे दोन तासांपासून झालेली वाहतुकीची कोंडी दूर झाली.”

यावेळी नगरअध्यक्ष आनंद पाटील, अमोल व्यवहारे, गजानन बेलदार, गोलू बर्डिया, नगरसेवक हर्षल वडगुजर, मुखेड येथील प्रकाश पाटील, दीपक माळी, जलचक्र येथील नितीन शिंदे आदी. शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content