जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा शिरातील गिरणा नदीपात्र काल मंगळवारी अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. आज मयत तरूणाची ओळख पटली असून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनील जानकीराम नन्नवरे वय ३२ रा. बांभोरी असे मयत तरुणाचे नाव आहे. तो १६ तारखेपासून बेपत्ता होता. तरी पोलीसात नोंद देखील आहे. मयताने त्याच्या कमरेला चप्पल बांधलेली होती. त्यावरुन नदी ओलांडत असतांना खोल खड्यात पाय घसरुन पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील सावखेडा बुद्रक येथील पोलीस पाटील चंद्रकांत उत्तमराव सोनवणे यांना मंगळवारी दुपारी गावालगत असलेल्या गिरणानदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली होती. अनेक दिवसांपासून मृतदेह पाण्यात पडून असल्याने तो कुजला होता, तसेच त्याला दुर्गंधी सुटलेली होती. हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मयत सुनील सुधाकर नन्नवरे हा १६ एप्रिल रोजी कामाल जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. तीन दिवस उलटूनही तो घरी परतला नव्हता. आज सकाळी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांनंतर शंका आल्याने सुनील नन्नवरे यांचा भाऊ अनिल नन्नवरे याने नातेवाईकांसह तालुका पोलीस स्टेशन गाठले. जिल्हा रुग्णालयात जावून पाहणी केल्यावर कपड्यांवरुन व कमरेला बांधलेल्या चपलेवरुन त्याची ओळख पटविली. त्याच्या पश्चात पत्नी तसेच वडील जानकीराम दोधू नन्नवरे, आई सुनंदाबाई, भाऊ अनिल, समाधान, अजय व पत्नी असा परिवार आहे.