रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वयंपाक केला नाही म्हणून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रावेर शहरात घडली आहे. या बाबत वृत्त असे की महात्मा फुले चौकातील रहिवाशी नंदकिशोर रघुनाथ चौधरी यांची पत्नी मनीषा नंदकिशोर हीने स्वयंपाक केला नाही याचा राग आल्याने नंदकिशोर याने रागाच्या भरात मनिषाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने दोन तीन वार करून गंभीर जखमी केले.
या बाबत गौरव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी नंदकिशोर चौधरी याच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला करण्याच्या गुन्हाची नोंद केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक आशीष आडसुर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन नवले पुढील तपास करीत आहे.