यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातुन जाणाऱ्या राज्य महामार्गा वरील बुऱ्हाणपुर ते अंकलेश्वर मार्गावरील कला वाणिज्य महाविद्यालया पासून तर चोपडा मार्गावरील वनविभागाचे कार्यालय आणी यावल ते भुसावळ या मार्गावरील भुसावळ पाँईट ते जुना भुसावळ नाका या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असुन, अनेक वाहनांचे अपघात या रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे होत आहे. या अपघातात गंभीर दुखापत झालेल्या वाहनधारकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे.
यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील मार्गावरील रस्ता आणि इतर विभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अधिकारी यांना तात्काळ संबंधीत माहीती देवुन या मार्गाची दुरुस्ती करून या मार्गावर भविष्यात होणारे संभाव्य भिषण अपघात टाळावे यासाठी रस्ता दुरूस्तीच्या मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार व शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे यावल तालुका प्रमुख सागर सपकाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरीष्ठ लिपिक विकास जंजाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावल भुसावळ रस्ता अत्यन्त् खराब झालेला आहे तो तात्काळ दुरुस्त करण्यात यावा आणी बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्ता .कला ,वाणिज्य कॉलेज पासून तर वन विभाग कार्यालयापर्यंत च्या रस्त्याच्या दोन्ही बाजू अत्यंत रस्ता खराब झालेला आहे.ती लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा आणी रस्त्यच्या दोन्ही बाजूने पाणी निसरा करण्यासाठी नाली करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी निवेदनाव्दारे केली आहे .