भुसावळ संतोष शेलोडे । शहरात रेल्वे प्रशानातर्फे ‘द हेरीटेज रेल्वे म्युझियम’ हे वस्तू संग्रहालय नुकतेच सुरू करण्यात आले असून यात अनेक दुर्मीळ बाबींचा संग्रह करण्यात आला आहे.
भुसावळ म्हटले की, पहिल्यांदा रेल्वेचे नाव समोर येते. अर्थात, ते खरेदेखील आहे. भुसावळ आणि रेल्वे हा जणू काही समानार्थी शब्द बनला आहे. काळाच्या ओघात रेल्वेत अनेक बदल झाले. तसेच बदल अलीकडे भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातदेखील झाले. भुसावळ रेल्वे स्थानकाचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलला आहे. येथे अत्याधुनीक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. याच्या जोडीला स्थानकाच्या बाहेरचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तर अलीकडेच रेल्वे वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
शहरातील अमर स्टोअरच्या समोरील बाजूस असणार्या जुन्या दादर्याला पाडून मोकळ्या झालेल्या जागेत हे ‘द हेरीटेज रेल्वे म्युझियम’ सुरू करण्यात आले आहे. यात रेल्वेच्या आजवरच्या विकासातील महत्वाचे टप्पे मांडण्यात आले आहेत. यामध्ये जुने रेल्वे इंजिन, डबे, प्रवासी बोग्या, जुनी उपकरणे, सिग्नल यंत्रणा, घड्याळे, घंटा आदी बाबींचा संग्रह एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. यासोबत येथे रेल्वे, इंजिन्स, रेल्वे एक्सप्रेस, मॉडेल स्टेशन्स आदींची मिनिएचर मॉडेल्स अर्थात लघू आवृत्त्यादेखील सादर करण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तू आपल्याला निश्चितच वेगळ्या जगात घेऊन जातात. हे संग्रहालय सर्वांसाठी खुले आहे. याचा पत्ता आणि गुगल मॅप्सवरील लोकेशन सोबत दिलेले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या संग्रहालयाची झलक दाखवणारा व्हिडीओदेखील दिलेला आहे.
पहा : भुसावळच्या ‘द हेरीटेज रेल्वे म्युझियम’चा हा व्हिडीओ.
गुगल मॅप्सवर पहा अचूक लोकेशन