जळगाव प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे उद्या जामनेर तालुक्यात अतिवृष्टी तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पाहणी करणार असून नुकसानग्रस्तांशी संवाद साधणार आहेत.
जामनेर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे मुंबईत असल्याने त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आधीच निर्देश दिलेले आहेत. या अनुषंगाने आता पालकमंत्री उद्या जामनेर तालुक्याच्या दौर्यावर असल्याची माहिती प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ रोजी ना. गुलाबराव पाटील हे सकाळी ८ वाजता पाळधी येथून ओझर बु. व ओझर खु. येथे जाणार आहेत. यानंतर ते हिंगणे न.क.; तोंडापूर येथे पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत.