पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा धावता आढावा; नवीन योजनांची घोषणा नाहीच ( व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 03 08 at 11.35.48 AM

जळगाव (प्रतिनिधी)। शासकीय प्रोटोकॉल म्हणून पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली. गेल्या दोन वेळा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. ऐनवेळी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे कार्यक्रमासाठी डिपीडीसीची बैठक रद्द करण्यात आल्या होत्या. गेल्या सहा महिन्यापासून जिल्हा आढावा बैठकीत कोणत्याही नवीन योजनांची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान आज मुंबईत मंत्रीमंडळाची बैठक असल्याचे सांगत विभाग निहाय योजनांची माहिती व आढावा दीड तासात उरकता घेतला. जिल्हा वार्षिक योजनांतर्गत फेब्रुवारी अखेर झालेल्या खर्चाचा आढावा, नविन प्रस्तावास मंजूरी देणे, आदर्श आमदार ग्राम योजनेचा आराखडा मंजूर करणे, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेचा अखर्चीत निधीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्याहस्ते 300 कोटी रूपयांचे ई-भूमीपूजन आणि ई- लोकार्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव वाघ, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार चंद्रकात सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, महापौर सिमा भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा परिषदेच्या सदस्या उज्ज्वला पाटील, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जि.प.सदस्य तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

टंचाई गावांना टँकर देण्याच्या सुचना
मुक्ताईनगरातील 40-50 गावांमध्ये गेल्या 20 ते 22 दिवसांपासून पाईपलाईन फुटल्याचे प्रकार वाढत असून या गावांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. स्थानिक अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे केला. यावर पालकमंत्री यांनी नवीन योजना येण्यापुर्वी आहे त्या पाईपलाईन तातडीने येत्या आठ दिवसाच्या आतदुरूस्ती कराव्यात असे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठल्याही गावात पाण्याची अडचण किंवा टंचाई भासत असेल त्या त्या ठिकाणी टँकरची उपलब्धता करून देण्याच्या निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्यात.

मंजूर योजनांसाठी नियमित विज पूरवठा करा- पालकमंत्री
पाणी टंचाईबाबत सहकार राज्यमंत्री यांनी सांगितले की, जिल्ह्यासाठी राष्ट्रीय पेय योजना मंजूर असतांना जूनी विजेची थकबाकी भरा त्याशिवाय वर्क ऑर्डर मिळणार नाही असे महावितरणकडून सांगितले जाते. धरणगाव मतदार संघातील तीन गावांना ही योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र एमएसईबीच्या अडमुठे पणामुळे मंजूर काम होत नसल्याची माहिती यावेळी सांगितले. यावर पालकमंत्री यांनी मंजूर कामे वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगितले. दर आठवड्याला एमएसईबी, जीवन प्राधिकरण योजना, चाराशी संबंधित आणि रोजगार हमी योजना या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व समस्या सोडविण्यात येणार आहे. तसेच विजेच्या निगडीत असलेल्या योजना विजेमुळे बंद राहणार नाही अश्याही सुचना यावेळी देण्यात आल्यात.

चारा टंचाई आणि रोहयोबाबत चर्चा
जिल्ह्यात 14 लाख 33 हजार 511 मेट्रीक टन चारा जिल्ह्यासाठी लागतो. त्यातील 13 लाख 18 हजार मेट्रीक टन हा जिल्ह्यातून उत्पादित होतो. त्यामुळे चाऱ्याची टंचाई अगदी जुलैच्या अखेरीस भासणार आहे. तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार जास्त उपलब्ध असून मजूरांची संख्या कमी आहे. कृषी विभागात ठिबकसाठी 1937 लाख रूपयांपैकी 1648 लाख रूपये खर्च झालेले आहे. उर्वरित रक्कत लवकर खर्च करण्याचे आश्वासन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिले. दरम्यान गरजू शेतकऱ्यांना ठिबक लवकरात लवकर मिळावी यासाठी काही तरतूद कराव्या अश्या सुचनाही कृषी विभागाला देण्यात आल्यात.

नुकसान भरपाई व दुष्काळ अनुदान
दुष्काळ नुकसान भरपाईसाठी 404 कोटी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून 3 लाख 52 हजार 512 शेतकऱ्यांच्या खात्या 246 कोटींचे वितरण करण्यात आले. शिवाय 165 कोटी रूपयांचा विम्याची रक्कम मिळाली असून आठ हजार 557 शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी एक लाख रूपये जमा करण्यात आले आहे. शिवाय केंद्र सरकारकडून 2 हजार रूपयांचा पहिला टप्पा येणार आहे त्यासाठी 6 लाख 91 हजार नावे निघाली तर दोन लाख 92 जणांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. तसेच बोंडअळीचे पैसे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

जिल्हा नियोजन सदस्यांचा निधी वाढवून देण्याची मागणी
जिल्हा नियोजन सदस्याचा निधी 20 ते 25 लाख वाढवून मिळावा यासाठी जिल्हा नियोजनचे सदस्यांनी जिल्हा नियोजन बैठकीत मागणी केली असता नवीन योजनेंतर्गत कामांची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी जि.प.सदस्यांनी केली. जिल्हा परिषदेच्या सदस्यांना कामांची संधी दिला जाणार असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन सदस्यांचा निधी वाढीव करून मिळावा अशी मागणी यावेळी उपस्थित जिल्हा नियोजन सदस्यांनी केला.

मान्यवरांच्याहस्ते विविध कामांचे ई-भूमीपूजन आणि ई-लोकार्पण
1. जळगाव शहरातील शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय परीसरात अल्पसंख्यांक मुलींसाठी वसतीगृहाचे उद्घाटन
2. यावल येथे अद्ययावत प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
3. यावल हरिपूरा टाकरखेडा निमगाव भादली आसोदा जळगाव या 20 किलोमीटर रस्त्याचे भूमीपूजन
4. भिकनगाव पाल खिरोदा सावदा आमोदा रस्ताच्या कामांचे उद्घाटन
5. खिरोदा फैजपूर रोझोदा चिनावल विवरा कुसुंबा या दरम्यानच्या रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन

Add Comment

Protected Content