तीन हजाराची लाच घेणारा वरिष्ठ लिपीक अटकेत

acb 1

जळगाव । सेवानिवृत्त झालेल्या तक्रारदार यांना पेन्शन फाईलमधील त्रृट्यांची पुर्तता करून पेन्शन फाईल पुढे पाठविण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच घेतांना जिल्हा परिषदेतचे बांधकाम विभागाचे वरीष्ठ लिपीकास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले असून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे सेवानिवृत्त असून त्यांना पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी जिल्हा परिषदेत प्रस्तावा पाठविण्यात आला आहे. पेन्शन फाईलमधील त्रृट्यांची पुर्तता करून सदर पेन्शन फाईल पुढे पाठविल्याच्या मोबादल्यात तक्रारदारकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यकरत असलेले वरीष्ठ लिपीक देवीदास ओंकार सोनवणे (वय-57, रा.वाघ नगर, जळगाव) यांनी तीन हजार रूपयाची मागणी 7 मार्च रोजी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी आज 8 मार्च रोजी देतो असे सांगितल्यानंतर आज शुक्रवारी रोजी तीन हजार रूपये रोख रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.ना.मनोज जोशी, शामकांत पाटील, सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, अरूण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर या पथकाने कारवाई केली.

Add Comment

Protected Content