मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जमीन घोटाळाप्रकरणी खटला चालवण्यास राज्यपालांनी दिली मंजूरी

बंगळूरू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी जमीन घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी 3 याचिकांच्या आधारे त्यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी 26 जुलै रोजी अधिवक्ता कार्यकर्ते टीजे अब्राहम यांच्या याचिकेवर राज्यपाल थावरचंद यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे 7 दिवसांच्या आत उत्तर मागितले होते की त्यांच्याविरुद्ध गुन्हा का दाखल करू नये.

कर्नाटक सरकारने 1 ऑगस्ट रोजी राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना दिलेली कारणे दाखवा नोटीस मागे घेण्याचा सल्ला दिला होता आणि राज्यपाल कार्यालयाच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर नऊ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी MUDA अधिकाऱ्यांच्या संगनमताने 50:50 साइट वितरण योजनेंतर्गत महागड्या जागा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.

Protected Content