सरकारकडून संसदेत लोकशाहीचा आवाज बंद करण्याचं पाप केला जात आहे; निलंबनानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली-वृत्तसेवा | सरकारकडून संसदेत लोकशाहीचा आवाज बंद करण्याचं पाप केलं जात असल्याचा हल्लाबोल शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सरकारला चर्चा करायची नाही, त्यांच्याकडून दडपशाही सुरु असल्याचे सुळे म्हणाल्या. अशातच आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निलंबित करण्यात आलं आहे.

संसदेत झालेल्या घुसकोरी प्रकरणी चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, यावर सरकारला चर्चा करायची नाही, त्यांच्याकडून दडपशाही सुरु असल्याचे सुळे म्हणाल्या. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत बोललं पाहिजे असेही सुळे म्हणाले. आम्ही प्रश्न विचारु शकत नाही का? असा सवालही सुळे यांनी केला. भाजप खासदराच्या पासेसवर ती मुलं संसदेत आली होती, आता त्यावर चर्चा नको का करायला असेही सुळे यावेळी म्हणाल्या. विषय फक्त खासदाराच्या सुरक्षेचा नाही तर येथील पोलिसांसह सर्व कर्मचाऱ्यांचा असल्याचे सुळे म्हणाल्या.

आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मात्र, सरकरला मार्ग काढायचा नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. संसद चालवण्याची जबाबदारी सरकारची असते.विरोध नको म्हणून आम्हाला निलंबीत केल्याचे सुळे म्हणाल्या.

आमची एवढीच विनंती आहे की, संसदेतील घुसखोरी प्रकरणी या विषयावर चर्चा करावी. गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यावं, पण त्यांना चर्चा करायची नसल्याचे सुळे म्हमाल्या. 100 हून अधिक खासदारांचं सरकारकडून निलंबन केलं आहे. हा लोकशाहीचा आवाज बंद करण्याचे पाप असल्याचे सुळे म्हणाल्या.

Protected Content