यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी श्रीगणेश उत्सवासाठी सालाबादप्रमाणे यंदा देखील येथील शहरातील नवभारत गणेश मित्र मंडळाची वार्षिक बैठक घेण्यात आली व या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रमोद नेमाडे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणुन यावल नगर परिषदचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते व भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे व भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, धीरज महाजन व नितीन महाजन, राजू करांडे यांच्या उपस्थिती मध्ये यंदाच्या श्रीगणेश उत्सवासाठी मंडळाची नुतन कार्यकरणीची निवड करण्यात आली आहे.
त्यामध्ये अध्यक्ष रितेश बारी,उपाध्यक्ष उज्वल कानडे, खजिनदार स्नेहल फिरके सहखजिनदार ओम महाजन, सचिव भोजराज ढाके यांची निवड करण्यात आली. बैठकीचे सुत्रसंचालन पी. टी. चोपडे यांनी केले. दरम्यान बैठकीच्या सुरूवातीस कै. रमेश विठू पाटील कुटुंब नायक पडळसा याचे नुकतेच निधन झाले व यावल शहर व तालुक्यातील ज्ञात अज्ञात अशा व्यक्ती ज्यांचे निधन झाले त्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी डॉ कुंदन फेगडे यांनी मनोगत व्यक्त करीत उपस्थित सर्व समाज बांधव व गणेशभक्त या तरूणांना तोला मोलाचे मार्गदर्शन केले .