फळविक्रेत्याची दुचाकी लांबविली; गुन्हा दाखल

भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जाम मोहल्ला येथील उर्दू शाळेजवळून फळ विक्रेत्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शेख आसिफ शेख उस्मान बागवान वय-४७, रा. जाम मोहल्ला, उर्दू शाळेजवळ भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून फळविक्री करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. ३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ डीएल ९०७३) घरासमोर लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली, हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेख असिफ शेख उस्मान बागवान यांनी बुधवारी ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान पाटील हे करीत आहे.

Protected Content