यावल तालुका समन्वय समितीची पहिली बैठक संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुका समन्वय समितीची पहिली बैठक येथील तहसील कार्यालयात रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावल येथील तहसीलच्या प्रशासकीय कार्यालयातील सभागृहात आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी आमदार चौधरी यांनी बैठकीत यावल तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत उपस्थित अधिकाऱ्यांना शासकीय योजनांची तातडीने अमलबजावणी करणे बाबतच्या सुचना दिल्यात , यावेळी तालुक्यातील पाणी पुरवठा असो सिंचनाचा प्रश्न असो गावपातळीवरील  विविध जातीच्या शासकीय निधीच्या माध्यमातुन विकास करणे याशिवाय तालुक्यातील येणाऱ्या समस्या बाबत आमदारांनी सविस्तर आढावा घेत मागील दोन वर्षातील कोरोना संसर्गाच्या काळात शासनाच्या विकास कामांचा वेग हा मंदावला होता.

मात्र पुढील अडीच आपल्याला विकास कामांचा अनुशेष हा वेगाने भरून काढावा लागणार असुन याकरीता आपण सर्वांनी , कामाला लागावे असे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगीतले. या बैठकीस समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , समिती सदस्य प्रा . मुकेश येवले , लीलाधर चौधरी ,रविन्द्र सोनवणे ,नितिन चौधरी , सदस्या श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती ललीता चौधरी, श्रीमती प्रेरणा भंगाळे, तहसीलदार महेश पवार , आयपीएस अधिकारी आशित कांबळे , निवासी नायब तहसीलदार आर के पवार, नायब तहसीलदार आर डी पाटील, फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर नगर परिषदचे अभियंता योगेश मदने, वन विभागाचे विक्रम पदमोर, वनजिव्य विभागाचे सहा . वनसंरक्षकअश्विनी खोपडे ,हतनुर पाटबांधारे एन पी महाजन, फैजपुर नगर परिषदचे मुख्याधिकारी वैभव लोंढे , पं .स .चे सहाय्यक गटविकास अधिकारी के सी सपकाळे , कृषी विभागाचे एस बी सिनारे, ग्रामीण पाणीपुरवठा चे पी बी देसले यांच्यासह आदी विभागाचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते . सर्व उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांनी मानले.

 

 

Protected Content