मीडियाला माहिती मिळते तर पोलिसांना का नाही ? : फडणवीस

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवार यांच्या घरावरील हल्ला निषेधार्ह असला तरी जर याची माहिती मिडीयाला मिळते तर पोलिसांना का नाही ? असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

परवा न्यायालयाने एसटी कर्मचार्‍यांना नोकरीवर हजर होण्याचे निर्देश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र काल दुपारी अचानक कर्मचार्‍यांचा एक जमाव शरद पवार यांच्या निवासस्थानी चाल करून गेला. तेथे या कर्मचार्‍यांनी धुडगुस घातल्याने राज्यात प्रचंड खळबळ उडाली. यानंतर एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. या हल्ल्याचा काल सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध केला. देवेंद्र फडणवीस यांनी कालच या प्रकरणाचा निषेध केला होता. यानंतर आज कोल्हापूरच्या दौर्‍यावर असतांना पत्रकारांशी बोलतांना त्यांनी पुन्हा यावर भाष्य केले.

फडणवीस म्हणालेत की, काल एसटीचे कर्मचारी शरद पवार यांच्या घराकडे जाणार असल्याची माहिती पत्रकारांना अडीच वाजताच मिळाली होती. जर पत्रकारांना ही माहिती मिळते तर पोलिसांना का नाही ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. यामुळे कालची घटना ही राज्यातील पोलीस खात्याचे अपयश असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

 

Protected Content