यावल येथे काँग्रेसची गांधीगिरी; न.पा. मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला पुष्पहार

यावल प्रतिनिधी । दिवाणीसाठी आणि निवासस्थानकासाठी जागा देण्यासाठी नगरपरिषदेने घेतलेला ठराव रद्द करून जाहीर नोटीसानुसार हरकत घेण्याबाबतचे निवेदन काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. मात्र न.पा.चे मुख्याधिकारी जागेवर नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.

काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल नगरपरीषदच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या हद्दीतीत गट क्रमांक २१८१ क्षेत्रफळ पैकी ४. ४ आर ही जागा नव्याने बांधण्यात येणाऱ्या न्यायलयासाठी देण्याबाबतचा ठराव १९ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतील क्रमांक६४४नुसार ठराव केला असुन या संदर्भातील माहीती साठीची नोटीस वर्तमानपत्रात आलेली असुन , सदर नगर परिषदच्या हद्दीतील हे क्षेत्र गट क्रमांक२१८१मधील जागाही शासनाने क्रिडा संकुल साठी आरक्षीत केलेली आहे व क्रिडा संकुलाकरीता ही जागा पुरेशी असल्याचे म्हटले असुन, मत क्रिडा संकुलाकरीता जर यातील २हेक्टर ईतकी जागा न्यायलयास दिल्यास क्रिडा संकुलकरीता आवश्क असलेली जागा ही कमी पडेल व त्याचा परिणाम ग्रामीण क्षेत्रातुन उदयास येणाऱ्या खेळाडुंवर होणार असुन , सदर यावल चे न्यायलय हे सद्याच्या सुखसोयी युक्त व चांगल्या परिस्थितीत असुन , सबब गट क्रमांक२१८१मधील जागा देण्याबाबतच्या घेतलेल्या ठरावास आमची हरकत आहे. नगर परिषद ने न्यायलयासाठी दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.

यावेळी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी शहर अध्यक्ष कदीर खान, पुंडलीक बारी, ईम्रान खान रशीद खान, अमोल रसुर्यकांत भिरुड, शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अनिल जंजाळे, यावल शहर अल्पसंख्याक आघाडीचे गुलाम रहेमान खाटीक, शेख युसुफ शेख उस्मान निवेदन देण्यासाठी आले. मात्र नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित नसल्याचे पाहून संतप्त काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.

Protected Content