पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील कृष्णापुरी शेत शिवारातील विहीरीतुन इलेक्ट्रीक मोटर अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रविवारी २९ जानेवारी रोजी दुपारी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील कृष्णापुरी भागातील रहिवाशी मधुकर जंगलु सुर्यवंशी (वय – ६५) यांची मोंढाळा रोडवरील कृष्णापुरी, पाचोरा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शेत शिवारात गट क्रं ५३ /२ मध्ये शेत आहे. मधुकर सुर्यवंशी यांनी शेतातील विहिरीत पाणी उपसण्यासाठी मेघा कंपनीची जलपरी इलेक्ट्रीक मोटर टाकली होती. १५ जानेवारी दुपारी २ ते १९ जानेवारी सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमांनी शेतात अनाधिकृतपणे प्रवेश करुन विहीरीतील ४ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रीक मोटर लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली आहे.
मधुकर सुर्यवंशी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांच्या फिर्यादीवरून रविवारी २९ जानेवारी रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मनोहर पाटील हे करीत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.