भरधाव कंटेनरच्या धडकेत रिक्षातील चालक जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साकेगाव पुलाजवळ भरधाव कंटेनरची रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार ९ जून रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १० जून रोजी रात्री ८.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात कंटेनरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, मेहमुद खान सर्फराज खान वय ३४ रा. नशिराबाद जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. प्रवाशी रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ९ जून रोजी दुपारी ४ वाजता ते रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ८५३) ने भुसावळकडून नशिराबादकडे जाण्यासाठी निघाले. रिक्षा साकेगावच्या पुलावरून जात असतांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर क्रमांक (एमएच ०४ एलवाय ४०७१) ने रिक्षाला मागून धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी १० जून रोजी रात्री ८.३० वाजता नशिराबाद पोलीसात तक्रार देण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील हे करीत आहे.

Protected Content