खंडेराव महाराज मंदिराची दानपेटी फोडली

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोदे येथील खंडेराव महाराज मंदीरातील दानपेटी फोडून रोकडसह मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोदे गावाच्या बाहेर खंडेराव महाराजांचे मंदिर आहेत. या ठिकाणी मंदिराची देखभाल रवींद्र कन्‍हैयालाल गुरव हे पाहतात. १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता नेहमीप्रमाणे मंदिर बंद करून कुलूप लावून ते घरी गेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदीराच्या कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीतील ३ हजार ५०० हजाराची रोकड, ऍम्प्लिफायर आणि बेन्टेक्सचे दागिने असा एकूण ८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दुसऱ्या दिवशी १७ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता चोरी झाल्याचे लक्षात आले.  रविंद्र गुरव यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल शेख करीत आहे.

Protected Content