Home क्राईम ऑटो नगरातून कारची चोरी

ऑटो नगरातून कारची चोरी

0
51

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ऑटो नगरातून ७५ हजार रुपये किंमतीची चार चाकी वाहन चोरून नेल्याचे घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, लक्ष्मीकांत बाळकृष्ण फटांगडे (वय-६९) रा. आयोध्यानगर, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी त्यांची कार क्रमांक (एमएच १९ एपी ८८०) ऑटोनगर येथील हिंदुस्तान इंजिनिअरिंग वेल्डिंगच्या दुकानासमोर पार्क करुन लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रुपये किंमतीची कार चोरून नेल्याचे ११ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीला आले. त्यांनी परिसरात चार चाकी वाहनाचा शोधाशोध केला, परंतु वाहन कुठेही मिळाली नाही. अखेर त्यांनी १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.


Protected Content

Play sound