महादेव मंदीरातील दानपेटी फोडून रोकड लांबविली; चोरटा सीसीटीव्हीत कैद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील बारी वाडा येथील मंदीरातील दानपेटीतून पैसे काढून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याला अटक देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी रविवारी ५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल प्रकाश बडगुजर (वय-२०) रा. लक्ष्मी नगर, जळगाव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

रामानंदनगर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळा परिसरातील बारी वाडा येथे हनुमान व महादेव मंदीर आहे. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी अमोल बडगुजर हा महादेव मंदीराच्या बाहेर असलेल्या दानपेटी फोडून रोकड काढून घेतली. एवढेच नाही तर हनुमान व महादेव मंदीराच्या ओट्यावर घाण करून मंदीराचे पवित्र भंग केला. हा प्रकार घडल्यानंतर याच परिसरात राहणारा एका तरूणाने त्याला आवाज दिला. तेवढ्यात संशयित आरोपी अमोल बडगुजर हा चोरटा पसार झाला. दरम्यान, मंदीरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी मोहन बारी या तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी ५ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजता संशयित आरोपी अमोल बडगुजर याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.

 

Protected Content