यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या शासनाने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण या योजने च्या लाभार्थी महीलांच्या माध्यमातुन मोठा प्रतिसाद मिळत असुन , कागदपत्रांच्या जुळवा जुळवीला वेळ जाणार आहे.
या योजनेचे अर्ज स्विकारण्याची मुद्दत ही ३१ जुलै पर्यंत वाढवुन मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी निवेदनाव्दारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे. या बाबत मनसेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य शासना संपुर्ण राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना दिनांक १ जुलै पासुन सुरू केली असुन, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय आदी कार्यालयांवर आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान असे असतांना शासनाकडून काही अटीशर्ती लागु केल्या असुन , त्यात प्रामुख्याने डोमेसाईल आणी जन्माचा दाखल लागणार असल्याने शासकीय कार्यालयातुन किंवा सुविधा केन्द्रातुन होमेसाईल मिळवण्यासाठी किमान एक आठवडता ते दहा दिवसाचा कालावधी लागणार आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्विकारण्याची अंतीम मुद्दत ही १५ जुलै२०२४ अशी ठेवण्यात आली असुन, कागदपत्रांची जोडणी करीता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असुन,अर्ज करण्यासाठीचा हा वेळ फारच अल्प असल्याने , या योजने पासुन अनेक लाभार्थी महीलांना वंचित राहावे लागू शकते,तरी लाभार्थी महिलांना डोमेसाईल व ईतर दाखले मिळवण्यासाठी लागणारा वेळ पाहता शासनाने या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किमान ३१ जुलैपर्यंत वेळ द्यावी अशी मागणी केली आहे