देशात रूग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्क्यांवर

नवी दिल्ली – भारतात कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर 74.74 टक्के झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण 21.5 लाख रूग्ण बरे झाले आहेत.

गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतात कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर 74.30 टक्के झाला आहे. याव्यतिरिक्त 33 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात रूग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांहून अधिक आहे. कोरोनाचे सध्या 6,92,028 सक्रिय रुग्ण आहेत.

देशात आतापर्यंत एकूण 21,58,946 रुग्ण बरे झाले आहेत. ही संख्या सध्या सक्रीय रुग्णांच्या संख्येपेक्षा 14,66,918 अधिक आहे. त्याचबरोबर कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण(दर) 1.89 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. गुरुवारी, 8,05,985 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यानंतर एकूण चाचण्यांची संख्या 3,34,67,237 वर गेली आहे.

17 जून रोजी रुग्ण बरे होण्याचा दर 52.8 टक्के होता, जो 16 जुलै रोजी वाढून 63.24 टक्के झाला आहे. आज हा दर 74.30 टक्के आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘ भारतात कोरोना रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. हा दर निरंतर कमी होत आहे.सध्या हा दर 1.89 टक्के आहे.

Protected Content