पिंपळकोठा बु ॥ येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र रिंगणगाव यांच्या अंतर्गत कोरोना लसीकरण केंद्राला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. धिरज मराठे, डॉ. अमोल भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभारंभ झाला.

यावेळी लसीकरणाच्या शुभारंभ उपकेंद्राच्या  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत पर्यवेक्षक अधिकारी तथा माध्यमिक शिक्षक वाल्हे यांना आरोग्य सेविका सुनीता चौधरी यांनी लस टोचून व समुपदेशन करुन केली. लसिकरणासाठी आलेल्या लाभार्थींची कोरोना चाचणी करण्यात आली व ४० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

लसीकरण यशस्वितेसाठी आरोग्य सहाय्यक संजय ठाकुर, गौतम नन्नवरे, केंद्र आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ.शेख, आरोग्य सेवक आंधळे, सरपंच शरद ठाकुर यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समिती सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत शिपाई यांनी परिश्रम घेतले.

Protected Content