लोहारी येथे खा. उन्मेश पाटलांमुळे वीज पुरवठा सुरळीत

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारी हायस्कूलजवळील डी.पी. केबल सतत जळत असल्याने गेल्या पंधरवड्यापासून वीजपुरवठा खंडित होता. या संदर्भात खा. उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधून केबल जोडण्याची विनंती केली. पाटील यांनी तातडीने वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना बोलावून दोन दिवसांत केबल बदलण्याचे आदेश दिले. वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

तालुक्यातील लोहारी येथील हायस्कुल लगतच्या डी.पी. ची सातत्याने केबल जळत असल्याने गेल्या पंधरवाड्यापासून वीज पुरवठा खंडित झाला होता. याबाबत जळगांव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे लोहारी ग्रामपंचायत सदस्य तथा भा.ज.पा. तालुका उपाध्यक्ष शरद पाटील यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी केबलची जोडणी करण्यासंदर्भात विनंती केली होती. खा.उन्मेष पाटील यांनी तातडीने विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना फोन करून दोन दिवसाच्या आत केबल बदलून संबंधित हायस्कूल जवळीर डी.पी. वरील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने हायस्कूल जवळील डी.पी. ची तातडीने केबल बदलून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने या परिसरातील ५६ शेतकऱ्यांचे सुमारे ३०० एकरावरील पिके वाचली आहेत. खासदार उन्मेष पाटील दिल्ली येथील अधिवेशनात व्यस्त असतांना देखील तातडीने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी खंबीर पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य भा.ज.पा. तालुका उपाध्यक्ष शरद पाटील, शिवाजी पाटील, संजय कर्नल, किशोर पाटील, श्याम पाटील, नवल पाटील, राजेंद्र कुमावत, हिराजी पाटील, मंगेश वायरमन, किशोर कुमावत यांचेसह सर्व संबंधित शेतकऱ्यांनी खा. उन्मेष पाटील यांचे आभार मानले आहेत.

 

Protected Content