कोरोना राष्ट्रीय आपत्ती घोषित करा — संजय राऊत

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच सांगत होते की कोरोना राष्ट्रीय आपत्ती घोषित करा. त्यांनी गृहमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे तशी मागणीही केली होती. मात्रकोणी प्रतिसाद दिला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने तेच म्हटलं आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं

 

सर्वोच्च न्यायालयाने आता कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं सांगितलं आहे. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

 

 

सध्या महाराष्ट्र सरकार सर्वात चांगलं काम करत आहे. काही दिवसांनी देशाला महाराष्ट्र मॉडेलप्रमाणे काम करावं लागेल असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली देशात सर्वात चांगलं काम महाराष्ट्र करत आहे, असंही ते म्हणाले. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र अनेकांनी केलं मात्र ते त्यात अयशस्वी ठरल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.

 

 

काही दिवसांपूर्वीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. दिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत त्या पद्धतीने देशाला काम करावं लागेल असं ते म्हणाले होते.

 

“मुंबईत रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २४ तास काम करत आहेत. प्रत्येक गावात, घरात काय सुरु आहे त्याची माहिती घेत आहेत. महाराष्ट्रात लवकरच परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहे”, असं राऊत म्हणाले होते.

Protected Content