देश विरोधकांना शिक्षा देईल – पंतप्रधान मोदी

1552108584 modi111

परळी प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ‘भाजपाने जेव्हा जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवले, तेव्हा काँग्रेससह सर्वांनी विरोध केला. ही लोकशाहीची हत्या असल्याची भाषा वापरली. विरोधकांच्या या कर्माच्या शिक्षा देश त्यांना देईल. पण पहिली संधी महाराष्ट्राला मिळाली असून, ती सोडू नका’, असे आवाहन मोदींनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा प्रचारार्थ सभेत केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरूवारी मोदी यांची राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळीत सभा झाली. यावेळी मोदी यांनी विरोधकांवर कलम ३७०वरून निशाना साधला. मोदी म्हणाले, ‘केंद्र सरकारने कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरमधील वंचितांना, अल्पसंख्याकांना अधिकार मिळवून दिले. मात्र इथेही विरोधकांचा स्वार्थ जागा झाला. आम्ही राजकारणासाठी करत नाही. तर देशासाठी करतोय. विरोधक म्हणत आहेत की लोकशाही संपली आहे, मला तुम्ही सांगा लोकशाही संपली आहे का ?, असा सवाल मोदी यांनी उपस्थितांना केला.

Protected Content