भुसावळात आ. सावकारे यांच्या प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत (व्हिडीओ)

bhusaval 3

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदान संघातील भाजप उमेदवार आ. संजय सावकारे यांनी आज शहरातील विविध भागात प्रचार रॅली काढण्यात आली.

आज सकाळी जुन्या तालुका पोलिस ठाण्यानजीकच्या संतोषी माता मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मतदारांनी त्यांचे स्वागत करत आशीर्वाद दिला. शहरातील विविध ठिकठिकाणी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले.

या भागात प्रचार रॅलीला प्रतिसाद
शहरातील पंचशील नगरासह परिसरात रॅली काढण्यात आली. याप्रसंगी आमदारांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली. या प्रचार रॅलीत भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, उद्योजक मनोज बियाणी, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, अनिकेत पाटील, नगरसेवक किरण कोलते, राजेंद्र आवटे, राजेंद्र नाटकर, बापू महाजन, दाभाडे, रामदास सावकारे, शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, अमोल इंगळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.

Protected Content