भुसावळ लाईव्ह ट्रेंडन्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पातून अज्ञात चोरट्यांनी तांब्याच्या केबल वायरचे तीन बंडल एकूण ३ लाख ४९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. या केंद्रातील ६६० मेगा वॅट प्रकल्पातून अज्ञात चोरट्यांनी ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरच्या दरम्यान फ्लेक्सिबल पावर असलेल्या तांब्याची केबल वायरचे तीन बंडल असा एकूण ३ लाख ४९ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. या संदर्भात येथील कर्मचारी अनुपम अरुण यांनी भुसावळ तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे करीत आहे.