जिल्हाधिकारी पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ; लोहारात केली पाहणी

पाचोरा प्रतिनिधी । गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या ताफ्यासह लोहारा रोडवरील शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली आहे.

तसेच या परिसरात दोन दिवसात पडलेल्या पावसाची नों २१४ मी. मी. झालेली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाधित मालाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या मालाची शेतकऱ्यांसोबत पाहणी करून त्या संदर्भात चर्चा केली. यावेळी जील्हाधिकार्‍यांनी सर्व शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा या अधिकाऱ्यांसमोर नुकसानीचे पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या कपाशी पिकाच्या काळ्या पडलेल्या कैऱ्या व बोंडे जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले.

यावेळी पाचोरा तहसिलदार कैलास चावडे, जि. प. सदस्य दिपकसिंग राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, मंडळ अधिकारी संजय साळुंखे, तलाठी बी. एम. परदेशी, तालुका कृषी अधिकारी अशोक जाधव,सरपंच कैलास भगत, सदस्य कौतिक पाटील व परिसरातील शेतकरी या वेळी उपस्थित होते.

 

Protected Content