शहरातील शाळेत पुन्हा सुरु झाली विद्यार्थ्यांची किलबील

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या आठवडाभरापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यास प्रतिसाद देत शहरातील शाळाही सुरु झाल्या असून शाळेत पुन्हा सुरु एकदा विद्यार्थ्यांची किलबील ऐकू येऊ लागली आहे.

‘कोविड १९’ आणि आणि ‘ओमायक्रोन’ यांच्या पार्श्वभूमीवर रुग्णाचा वाढता प्रसार पाहता राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या आठवडाभरापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याला प्रतिसाद देत शहरातील अनेक शाळा सुरू झाल्या असून शहरातील शाळेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची किलबिल ऐकू यायला लागली आहे. शाळेतील घंटा निनादू लागल्या आहेत. सामूहिक स्वरातील राष्ट्रगीताचे आणि प्रतिज्ञाचे स्वर कानी पडू लागले आहेत.

‘कोविड १९’च्या दिशानिर्देशाचं पालन करत राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जळगाव शहरात देखील अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत येत पहिला दिवस आनंद आणि उत्साहाने साजरा केला. यात शाळेतर्फे विद्यार्थ्यांचं टेंपरेचर चेक करण्यात आलं आणि त्यांना वेळोवेळी सॅनिटाईझही करण्यातही करण्यात आलं. सोशल डिस्टंसिंगचं पालन करत शाळेत शिक्षण दिले जात असून यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘शाळा ऑफलाइन सुरु असावी’ अशी इच्छा व्यक्त करत दामोदर धनंजय चौधरी या विद्यार्थ्यांने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “विद्यार्थ्यांनादेखील शाळा ऑफलाईन सुरू झाल्यामुळे आनंद आहे. ‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धतीत नेटवर्क प्रॉब्लेम किंवा इतर गोष्टींमुळे शिक्षणाला काही मर्यादा येतात.” असं त्याने सांगितलं.

तर “ऑनलाईनमध्ये समजत नसलेल्या बाबी ऑफलाइन समजतात. काही शंका असेल तर प्रत्यक्ष बोलून त्या शंकेचं निरसन होतं.” असं सांगत कोरोना नियमांचं पालन शाळेत केलं जात असल्याचं सृष्टी विशाल कुलकर्णी या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीने सांगितलं.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सरकारने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आनंदाचा आहे. पुढच्या दोन महिन्यात मुलांच्या परीक्षा असून शाळा सुरू झाल्याने मुलांच्या परीक्षा घेण्याची तयारी यानिमिताने होईल. ऑफलाईन होणार असल्याने परीक्षेच्या अनुषंगाने मुलांची मानसिकता तयार होण्यासाठी शाळा सुरु होणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या दृष्टीने ही शाळा सुरु होणं ही सकारात्मक बाब असल्याचं विविध शिक्षकांनी सांगितलं.

प्रत्यक्ष शाळेत बसून विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर शिक्षणाची पारंपरिक शिक्षण पद्धती ही प्रभावी शिक्षणपद्धती असल्याने कोरोना नियमांच्या दिशानिर्देशाचचे, नियमांचे पालन करून शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश दिला जात असल्याचं जळगावातील एटी झांबरे विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कोमल दास यांनी सांगितलं.

अनेक शाळेत विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी समूह गीताचा आनंद घेतला. सामूहिक प्रार्थनेच्या स्वरांनी अनेक दिवसांपासून शांत असलेला शाळेचा परिसर दुमदुमला. यावेळी शाळा सुरु झाल्याचा आनंद मास्क घातलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

Protected Content