कोरोना : जिल्ह्यात नव्याने २९३ कोरोना रूग्णांची भर; ४८८ रूग्ण झाले बरे !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने बुधवारी पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २९३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे तर ४८८ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज पाचोरा तालुक्यातील १ रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-४८, जळगाव ग्रामीण-४८, भुसावळ-२५, अमळनेर-३७, चोपडा-३७, पाचोरा-१८, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-८, एरंडोल-२, जामनेर-४१, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर-०, बोदवड-३ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण २९३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार ८२२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४६ हजार १३१ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज पाचोरा तालुक्यातील १ बाधित रूग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकुण २ हजार ५८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content