पाचोरा येथे कोरोनामुळे छत्र हरपलेल्या मुलांना मिळाला आधार

पाचोरा, प्रतिनिधी । कोरोनामुळे ओढावलेल्या संकटात अनेक जणांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे. यात दोन्ही पालकांचं निधन झाल्यामुळे लहान वयातच अनेक चिमुकल्यांचं छत्र हरपलं आहे. मात्र, पालक गमावलेल्या अशा २० मुलांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजारांचा धनादेश देण्यात आला आहे.

कोरोना काळात वडील आणि आजोबा यांचे एकाच आठवड्यात निधन झालेल्या बांबरुड (राणीचे) येथील कु. कल्याणी सुभाष काळे या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थीनीला जेसीस क्लब च्या माध्यमातून सायकल तर अंबे वडगाव येथील दिनेश रायबा हटकर या बारावीच्या विद्यार्थ्याचे आई, वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्याने मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या योगदान योजनेतून उच्च शिक्षणासाठी मोबाईल देण्यात आला. त्याच प्रमाणे पाचोरा शहरातील गौंड वस्तीतील १५ आदिवासी नागरिकांना रेशनकार्ड व ४ महिलांना श्रावण बाळ योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, नायब तहसिलदार भागवत पाटील, पुरवठा विभागाच्या नायब तहसिलदार पूनम थोरात, अव्वल कारकून भाऊसाहेब नेटके, सुरेश पाटील, अभिजित येवले, उमेश शिर्के, मंडळ अधिकारी वरद वाडेकर, संजय गांधी निराधार योजनेच्या सीमा पाटील, हेमंत जडे, तलाठी मयूर आगरकर, अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, प्रवीण ब्राह्मणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार कैलास चावडे, सूत्रसंचालन अभिजित येवले तर आभार मोहन सोनार यांनी मानले. 

यावेळी आमदार किशोर पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, कोरोना काळात पाचोऱ्यातील महसूल विभागाचे कार्य राज्य सरकार व नगरपरिषदेपेक्षा उत्तम असून महसूल प्रशासनाने उभारी आणि योगदान योजनेतून आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबियांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले असून कोरोना काळात चांगली सेवा देणारे सफाई कामगारांना मोफत टी शर्ट व शूज स्वखर्चातून घेऊन देने ही बाब कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात गोर गरिबांना रेशनकार्ड व अन्नधान्य वेळेवर मिळत नसल्याने तहसील कार्यालयाने सबंधीत गावचे मंडळ अधिकारी, तलाठी व पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समनव्य ठेऊन ही कामे सोपी करून द्यावे असे आवाहन करत पाचोरा शहरात गेल्या तीन पिढ्यांपासून अतिशय बिकट परिस्थितीत राहत असलेल्या गौंड समाजाची वस्ती पालिका हद्दीतील खारवन विभागात बसविण्यासाठी तातडीने जिल्हा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावा अशा सूचनाही यावेळी दिल्या.

वीस वारसांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ

पाचोरा तालुक्यात गेल्या ६ महिन्यात दारिद्र रेषेखाली येत असलेल्या २० नागरिकांचे विविध आजाराने निधन झाल्याने त्यांचे वारस समाधान ज्ञानेश्वर दिवटे, लता बाबूलाल चव्हाण, गीताबाई धनराज राठोड (निंभोरी), प्रभावती सुनील नागणे, उषा भगवान धनगर, अनिता चंद्रकांत बागुल, सीमा शिवाजी शेवाळे (पाचोरा), सोनाबाई हुसेन तडवी, इंदूबाई शांताराम कुंभार (शिंदाड), ललिता दौलत शेरे  (संगमेश्वर), विमलबाई रामदास मोरे  (दिघी), पूनम साहेबराव नाईक (नगरदेवळा), उषाबाई संजय अहिरे (कुऱ्हाड बु”), वालाबाई दिलीप अहिरे (सारोळा खु”), सरला सागर सुतार (लोहारा), कल्पना निंबा न्हावी (अंतुर्ली खु”), लताबाई पंडित सोनवणे (ओझर), कोकिळाबाई दगा गायकवाड  (चुंचाळे), आशाबाई राजेंद्र गोसावी  (सामनेर), लिलाबाई गोविंद फासगे  (नगरदेवळा) या २० वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येकी २० हजार रुपयाचे धनादेशाचे आमदार किशोर पाटील यांचे हस्ते गुरुवारी वाटप करण्यात आले.

Protected Content