वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील अक्सा नगरात येथे पिकअप वाहनाच्या धडकेत १४ वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुमान बेग असिफ बेग वय-१४ रा. अक्सा नगर, वरणगाव असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरातील अक्सा नगरात चालक शेख साहिल शेख सलीम हा गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता त्याच्या ताब्यातील मालवाहू पिकअप वाहन क्रमांक (एमएच ०४ इएल ८३०२) हा अक्सा नगरातून घेऊन जात असताना, त्याने रस्त्यावर चालत असलेल्या निजाम बेग असिफ बेग (वय-१४) या मुलाला धडक दिली.
या अपघातात त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान चालक शेख साहिल शेख सलीम हा पिकअप वाहन जागेवर सोडून पसार झाला. दरम्यान या घटनेबाबत शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात फरार झालेला चालक शेख साहिल शेख सलीम (वय-२१) रा.खिडकी मोहल्ला वरणगाव यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे हे करीत आहे.