जळगावात बांधकाम व्यवसायिकाची गळफास घेवून आत्महत्या

suscide

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बांधकाम व्यवसायिकाने कामाच्या ठिकाणी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, अनिल जगन्नाथ सुर्यवंशी (वय-५५) रा. वढोरा ता.चोपडा ह.मु. अष्टभुजा नगर, पिंप्राळा हे गेल्या २० ते २२ वर्षांपासून जळगावात राहतात. ते बांधकाम व्यवसायीक असून अनेक ठिकाणी त्यांचे बांधकामाच्या साईड सुरू आहेत. त्यापैकी तालुका पोलीस ठाण्याच्या समोर सृष्टी कंन्स्ट्रक्शनचे इमारती बांधकाम सुरू आहे. आज सकाळी ८ वाजता कामावर निघून गेले. आज दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याच परीसरात राहत असलेल्या एका मुलीच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईक आणि मित्र मंडळीची मोठी गर्दी जमली होती.

मयताच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा डॉ. कृणाल सुर्यवंशी आणि मुलगी कृतीका असा परीवार आहे. मुलगा डॉ. कृणाला हा जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात वैद्यकिय अधिकारी म्हणून काम करतात. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content