धक्कादायक : दारूसाठी बापावर केले विळ्याने वार; मुलावर गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जुनोने येथे दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने बापावर लोखंडी विळ्याने वार करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना मंगळवार १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शालीक पोपट महाले हे आपल्या परिवारासह अमळनेर तालुक्यातील जुनोने गावात वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान त्यांचा मुलगा सचिन शालिक महाले याला दारूचे व्यसन आहे. बुधवार मंगळवार १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता शालिक महाले हे त्यांच्या घराच्या ओट्यावर झोपलेले असताना त्यांचा मुलगा सचिन महाले हा त्या ठिकाणी आला व दारूसाठी पैसे मागितले. दरम्यान त्याला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या रागातून सचिने आपल्या बापावर लाकडी काठी आणि लोखंडी विळ्याने मारहाण करून गंभीर दुखापत केले. ही घटना घडल्यानंतर शालीक महाले यांना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर त्यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बुधवार १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता सचिन महाले यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील हे करीत आहे.

Protected Content